आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै अंतिम तारीख देण्यात आली आहे. यासाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहेत. आता पर्यंत जिल्ह्यातून तब्बल तीन लाख दोन हजार ५३९ अर्ज आले आहेत. गेल्यावर्षी खरिपासाठी तीन लाख ५४ हजार ८२ अर्ज आले होते. शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना शेती पिकाचे होणारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरुन काढण्यासाठी पिकांचा विमा काढण्यात येतो. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा काही हिस्सा हप्त्यापोटी भरण्यात येतो. दरवर्षी अनेक जिल्ह्यात आवर्षण, पावसाचा खंड, किडीने नुकसान, पीक वाहून जाणे आदीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यातून भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यानुसार यंदा शेतकऱ्यांना प्रारंभी विमा भरताना ई पीक पाहणी करण्याची सुचना दिली होती. नंतर कृषी आयुक्त कार्यालयातून हा आदेश मागे घेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
शेवटी शेतकऱ्यांनी यासाठी गर्दी करू नये, असे वांरवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत होते. परिणामी आठ दिवसांत दिड लाख अर्जांची संख्या आता थेट तीन लाखावर गेली आहे. आज शेवटचा दिवस असल्याने आपत्तीमुळे नुकसान भरुन काढण्यासाठी पउर्वरीत शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुदतवाढ देण्याची आवश्यकता, शेतकऱ्यांमध्ये चर्चा अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेकांना पीक विमा भरण्याची अडचण येत आहेत. त्यामुळे पीक विमा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा करण्यात येत आहेत.
शेवटच्या दिवशी एक लाख अर्जांची अपेक्षा
शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांमध्ये तीन लाख अर्ज केले आहेत. विमा भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करावी लागत असल्याने अनेकांना अडचणही आल्या आहेत. त्यामुळे आता पर्यंतचा आकडा गेल्या वेळ पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहेत. शेवटचा दिवस असल्याने एक लाख अर्ज येण्याची शक्यता जिल्हा व्यवस्थापक यांनी वर्तवली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.