आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्पर:15 किमी पाठलाग करुन पकडला रेतीचा टिप्पर

वडकी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातून उपसा करण्यात येणारी रेती जिल्ह्यात छुप्या पद्धतीने आणून विक्री करण्यात येत आहे. रेती घेवून येत असलेल्या टिप्परला मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने १५ किलोमीटर पाठलाग करुन पकडले. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातून राळेगावात रेतीची वाहतूक एक महिन्यापासून सुरु आहे. चंद्रपुरातील काही रेतीघाट लिलाव झाले असून तेथील रेती तस्करांनी राळेगाव तालुक्यात एकाच पासवर पाच ते सहा खेपा मारुन धुमाकुळ सुरू केला आहे. यासाठी तहसीलदारांनी नायब तहसीलदारांच्या अधिकारात पथक तयार केले. वडकी मंडळ अधिकाऱ्यांचे पथक रविवारी दुपारी कर्त्यव्यावर होते. चंद्रपूर जिल्ह्यातून येणाऱ्या रेतीच्या वाहनाची तपासणी सुरु असताना वाहन क्रमांक एमएच ३४ सीए १२१२ हे रेतीचे वाहन महसूल पथकाने थांबवले असता ते थांबले नाही. त्यामुळे या पथकाने त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. त्यात १५ किलोमीटर पाठलाग करण्यात आला.

यादरम्यान वडकी पोलीस ठाण्याला याची माहिती देवून त्यांची मदत घेण्यात आली. अखेर ते वाहन करंजी सोनामाता येथे पकडण्यात आले. त्यावेळी वाहन चालकाला मंडळ अधिकाऱ्यांनी पास विचारली असता चालकांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. चालकाजवळ पास आढळली नाही त्यावरून वाहनाचा पंचनामा करुन ते वाहन मंडळ अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा केले. आता तहसीलदार डॉ. रविद्रकुमार कानडाजे काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एका पासवर पाच फेऱ्या
चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कर लातूर, नांदेड अशा ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावरची पास बनवतात. त्या पासच्या आधारे राळेगाव शहरासह संपुर्ण तालुक्यात एका पासवर पाच ते सहा फेऱ्या मारतात. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो तसेच तो पडणारा माल वैध की अवैध हा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी महसूल प्रशासनाने नियोजन आखून त्यावर निर्बंध आणने गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...