आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवे‎ मारण्याची धमकी:वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या‎ वरिष्ठ तंत्रज्ञाला धक्काबुक्की‎

पुसद‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकडदाती येथे राहणाऱ्या वीज ग्राहकाने‎ सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे विजबिल‎ थकवले होते. ते विजबिल वसुलीसाठी सोमवार,‎ दि.१३ मार्च २०२३ रोजी सकाळी गेलेल्या वरिष्ठ‎ तंत्रज्ञ मनोज वानखेडे ला युवकाने धक्काबुक्की‎ करीत शिविगाळ केली. त्यानंतर जीवाने‎ मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिलेल्या‎ तक्रारीवरून शहर पोलिसांत काकडदाती येथील‎ पवन विलास कोरडेविरोधात गुन्हे दाखल‎ करण्यात आले आहे.‎ वरिष्ठ तंत्रज्ञ मनोज वानखेडे हे वीज ग्राहकाकडे‎ सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून थकीत‎ विजबिल एक हजार ७०० रूपये वसुलीकरिता‎ सोमवारी गेले होते.‎

बातम्या आणखी आहेत...