आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार हमी योजना:पेळू येथील रेशीम शेती लागवडीला दिग्रस तहसीलदारांनी दिली भेट

दिग्रस6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पेळू येथे रेशीम शेती तुती लागवडचे कामास दि. २५ जुलै रोजी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रेशीम शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.तालुक्यातील पेळू येथे नव्याने यावर्षी चार शेतकरी यांनी तुती लागवड करून रेशीम शेती करण्याचे नियोजन केले. प्रशाकीय मान्यता तहसील कार्यालय दिग्रस अंतर्गत प्राप्त झाली असून तांत्रिक मार्गदर्शन जिल्हा रेशीम विकास अधिकारी यवतमाळ यांचे कार्यालय मार्फत मिळते. यावेळी उपस्थित शेतकरी यांना तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी काही प्रश्न विचारले यामध्ये किती एकर मध्ये तुती लागवड केली, कीटक संगोपन गृह कुठे बांधणार, सिंचनाची सुविधा आहे का, किती रोप लावण्यात आले. त्यावर उपस्थित शेतकरी यांनी समाधानकारक असी माहिती दिली.

तुती रोप ५ हजार ५०० लावण्यात आली. संगोपनगृहाची जागा सुद्धा निश्चित करण्यात आली व सिंचनाची सुद्धा पूर्ण व्यवस्था आहे,असे या वेळी पंडित सोयाम, कृष्ण किरण चांदेकर, बबन झाडे या शेतकरी यांनी तुती रोप पाहणी व भेटी दरम्यान सांगितले. तहसीलदार प्रवीण धानोरकर, रोजगार हमी योजना विभाग वरिष्ठ लिपिक जंगले यांनी दिग्रस तालुक्यातील पेळू येथे भेट देवून तुती रोपांची व लागवडीची पाहणी केली. या प्रकल्पचे माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात रेशीम शेती करणारे शेतकरी यांना शासनाच्या योजना, तसेच रेशीम शेतीसाठी आवश्यक सोई सुविधा पुरविण्यात येत असून दिग्रस तालुक्यात या वर्षी १०० शेतकरी रेशीम शेतीसाठी तयार करण्यात आले असून शेतकरी यांची नोंदणी रेशीम गोल्ड शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत करण्यात आली आहे.

या नोंदणी करिता जिल्हा रेशीम विकास अधिकारी रेशीम विभाग यवतमाळ यांचे सहकार्य मिळत आहे. नोंदणीची प्रक्रीया सुरु आहे त्या पैकी ५१ शेतकरी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लाभ द्यावयाचा आहे. त्याच प्रमाणे शेतकरी यांना शासकीय योजनांचे माध्यमातून त्यांना शेती पूरक व्यवसाय निर्मिती करून देणे व त्यांचे उत्पादनास बाजारपेठ सुद्धा मिळवून देणे त्यांना रेशीम शेतीची परिपूर्ण माहिती देणे प्रशिक्षण,अभ्यास दौरा गाव स्तरीय बैठका आयोजित करणे इत्यादी कामे संस्थेमार्फत तथा शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत वेळोवेळी आयोजित केले जात असल्याचे सांगितले. या भेटी दरम्यान तहसीलदार धानोरकर, वरिष्ठ लिपिक जंगले यांचे शाल व पुष्प देवून स्वागत पंडित सोयाम, श्रीकृष्ण किरण चांदेकर, बबन झाडे उपस्थित शेतकरी व सरपंच सुनिता भड, संस्था अध्यक्ष व कंपनीचे मुख्य संचालक रवींद्र राऊत, संतोष सरदार, दशरथ भुजाडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...