आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचेरीवर जप्ती:जिल्हा कचेरीवर जप्तीची नामुष्की अखेर टळली

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा नांदेड रेल्वेच्या भूसंपादनात आठ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न मिळाल्याने त्यांनी जिल्हा कार्यालयावर जप्ती आणली. परंतु निवासी जिल्हा अधिकारी यांनी काही दिवसांचा अवधी मागितल्याने जप्तीची नामुष्की टळली.

प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ तालुक्यातील गहुळी हेटी येथील अशोक भानुसिंग राठोड, संदीप भुजंगा पवार, जीवन भोजू जाधव, शंकर लक्ष्मण मांजरे, श्रीराम रत्ना चव्हाण, पुंजी हरी जाधव, चंद्रभान भिवा ढोरे शिवा ढोरे यांची वर्धा नांदेड रेल्वे मार्गात जमीन संपादन करण्यात आली होती. दरम्यान गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात आला नाही.यामध्ये एक कोटी बारा लाख चा दावा शेतकऱ्यांना केला आहे. यापूर्वी तीन वेळा वॉरंट काढून देखील मोबदला मिळाला नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली. परंतु निवासी जिल्हा अधिकारी यांनी काही दिवसांचा अवधी मागितला. त्यामुळे जप्तीची नामुष्की टळली. यावेळी बिलिफ जनार्दन खडतरे, हरीश जाधव, वकील भगवंत विष्णू ठाकरे व आठ शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...