आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधाऱ्यांना टोला:शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने मदत द्यावी

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी मी करीत आहे. असे असताना इतक्या उशीरा पाहणी का, अशा बालीशपणाचे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात आहे. दौऱ्यासंदर्भात वाच्यता करण्यापेक्षा संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, असा टोला विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लगावला. शुक्रवार, दि. २९ जुलै रोजी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार यवतमाळ जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. अशात शुक्रवारी सायंकाळी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेचे ते बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुरूवातीला पाच जणांचे मंत्रीमंडळ होते. ते मंत्रीमंडळ ताकदीचे होते, त्यांना खातेसुद्धा वाटप करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याच्या कारभाराचा गाढा ओढत आहेत. मंत्रीमंडळाचा अद्याप विस्तार झाला नाही, खाते वाटप रखडले, अधिवेशनाचा पत्ता नाही, अशी परिस्थिती राज्यात आहे. गेल्या २४ वर्षांत पहिल्यांदाच यंदा भीषण पूर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. अजुन दोन महिने पावसाळ्याचे शिल्लक आहे. ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात शेतकऱ्यांना मदत करावी, असेही ते बोलताना म्हणाले.

जिल्ह्यात पावसाने सुमारे दोन लाख १५ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करा, पीक कर्ज माफ करा, अशी मागणी दौऱ्यादरम्यान शेतकरी करीत आहे. त्यामुळे सरकार चालवण्याकरता तुम्ही दोघे खंबीर असे असले तरीही ३६ जिल्ह्यात पालकमंत्री अधिक काम करू शकतात, असे मी सतत सांगत आहे. ते सोडून तुम्ही इतक्या उशीरा दौरा कसा करता, अशी वक्तव्य सुरू आहेत. सद्या केंद्राकडून राज्याने निधी मागावा, विशेष बाब म्हणून राज्याचा निधी द्यावा, एनजीओ, सीएसआर निधी वापरावा, पण शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, प्रती हेक्टरी ७५ हजार रूपयांची सरसकट मदत द्यावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.पत्रकार परिषदेत आमदार इंद्रनील नाईक, अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...