आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेती वाहतुक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वाराचा चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना महागाव तालुक्यातील गुंज येथे शनिवार, दि. १७ डिसेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. सुनिल धानोरकर वय ४० वर्ष रा. मधुकर नगर पुसद असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, माहुर येथून पुसदकडे रेती वाहतुक करणारा टिप्पर क्रमांक एमएच-०६-एसी- ६७५४ हा भरधाव वेगाने जात होता.
अश्यात गुंज येथील बसस्थानकानजीक असलेल्या निर्माणाधीन पुलाजवळ समोर असलेल्या दुचाकीला चिरडल्याने दुचाकीस्वार सुनिल धानोरकर हा जागीच ठार झाला आहे. रेती वाहतुक करणारा टिप्पर हा भरधाव वेगाने पुसदकडे जात होता. शनिवारी गुंज येथे आठवडी बाजार असल्याने नेहमीपेक्षा जास्त वर्दळ या ठिकाणी राहत असुन बसस्थानकाजवळील पुल मागील दोन वर्षांपासून निर्माणाधीन अवस्थेत असल्याने या ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. टिप्पर चालकाला समोरचे काहीही दिसुन न आल्याने हा अपघात घडून धानोरकर यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे या पुलाचे अपुर्ण काम पुर्ण करावे व रेतीच्या होणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीवर लगाम घालावा अशी नागरिक मागणी करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच महागाव ठाणेदार संजय खंडारे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली होती. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.