आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट मोर्चा नियोजन बैठक:महागाई, शेतकरी आत्महत्यांबाबत राज्य शासनाला जाब विचारणार

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईमुळे नागरिक, महिला त्रस्त आहेत. मात्र, राज्य सरकारचे याकडे लक्ष नाही. गेल्या काही दिवसात तर राज्याचे मान, अस्मिता असलेले छत्रपती शविाजी महाराज यांचे वरच आक्षेपार्ह विधान केली जात आहे. हा राज्याच्या अपमान आहे. राज्याची अस्मिता टिकविण्यासाठी तसेच महागाई, शेतकरी आत्महत्या अशा विविध विषयावर राज्य शासनाला जाब विचारण्यासाठी १९ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधविेशनावर विराट मोर्चा धडकणार असल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

ते सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी रॉयल पॅलेस येथे नागपूर येथील हविाळी अधिवशनावर धडकणार्‍या विराट मोर्चा नियोजनाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, बाबासाहेब गाडे पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नाना गाडबैले आदी उपस्थित होते.मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, बेरोजगार युवक त्रस्त आहेत. ईडी सरकार आल्यानंतर दहाव्या दिवसानंतर राज्यातील दीड लाख युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरात गेला. त्यानंतर दुसरा प्रकल्पही त्यांच राज्यात गेला. राज्यातील युवक बेरोजगार आहे. असे असतानाही राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गुजरातला मुजरा केल्याशविाय या राज्य सरकारचा दविस निघत नसल्याचा आरोप माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

कर्नाटक सीमावाद पेटला आहे. मात्र, राज्य सरकारकडून याबाबत गांभीर्याने यावर लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. हे सरकार कसे आले आहे, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारचे राज्यातील जनतेने स्वागत केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

मुंडे यांचे सुरक्षारक्षक रुग्णालयात विराट मोर्चाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रॉयल पॅलेस येथे झाली. बैठकीला मार्गदर्शन करुन निघताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सुरक्षारक्षक धनंजय पांडे अचानक कोसळले. त्यानंतर धनंजय मुंडे तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांना वाहनात बसून शहरातील खासगी रुग्णालय गाठले. त्यांचेवर त्याठिकाणी उपचार सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...