आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २०२३ च्या घनकचरा व्यवस्थापन निविदेमध्ये गैरप्रकार करून अंदाजे २९ टक्के कमी दराची निविदा रद्द करून दिग्रस नगर परिषदेने स्वतः कंत्राट चालवून आजपर्यंत कामगार कायद्यापासून कामगारांना वंचित ठेवण्यात आले. या कामगारांना योग्य सुविधा देण्यात याव्यात, या आमरण उपोषणाच्या प्रमुख मागण्या , कंत्राटी कामगारांना पूर्ववत सेवेत घेण्यात यावे, प्रलंबित मागण्या पुर्ण कराव्या, तांत्रीक मान्यता, प्रशासकीय मान्यता व निविदा अटी व शर्ती नुसार १६ घंटागाडी, २ ट्रॅक्टर चालु करावे अशी मागणी दिग्रस भीम टायगर सेना कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली होती.
मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सोमवार दि.१० एप्रिल पासुन नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाले आहे. दिग्रस नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दि.१ मार्च २०२३ च्या पत्रानुसार निविदा उघडण्यास किमान ३ ते ४ दिवस लागणार असे लेखी आश्वासन दिले होते, परंतु २४ दिवसांनंतरही निविदा उघडण्यात आली नाही. त्यामुळे निविदामध्ये गैरप्रकार कंत्राट मॅनेज झाले असे समजण्यास हरकत नसल्याचे निवेदनात नमूद आहे. संस्थेला अंदाजे २९ टक्के कमी दराच्या निविदा भरणाबाबत मुख्याधिकारी दिग्रस यांनी एका महिन्याच्या नंतर खुलासा सादरचे पत्र दिले.
त्यामुळे सदर निविदामध्ये पूर्णपणे गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी तसेच सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ यांनी किमान वेतन व विविध कायद्या बाबत चौकशी करून सदर घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट नगर परिषद, दिग्रसने चालवावा आणि कामगार कायद्यापासून वंचित असणाऱ्या कामगारांना कामगार कायद्यानुसार सुविधा द्याव्यात अशी मागणी करणारे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना भीम टायगर कामगार सेना दिग्रसचे शहर अध्यक्ष आनंद नैताम यांनी दिले होते, मात्र उपोषणकर्ते आनंद नैताम यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सोमवार दि.१० एप्रिल पासून उपोषणाला सुरुवात केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.