आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरील वाहतूक सुरळीत:दिग्रस शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

दिग्रस23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश उत्सवानिमित्त शहरातील मुख्य चौकासह इतरही रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी दिले होते. त्यावरून दिग्रस पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्यासह पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी रस्त्यावर उतरून वाहन धारकांना व्यवस्थित पार्किंग मध्ये वाहन लावण्याची तंबी दिली. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी चौक, मानोरा चौक, कच्ची चौक सह इतरही छोट्या मोठ्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्याने दिग्रस शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

विस्कळीत वाहतूक तत्कालीन ठाणेदार उदयसिंह चंदेल यांच्यामुळे सुरळीत झाली होती. तेव्हा ठाणेदार उदयसिंह चंदेल यांनी रस्त्यावरील वाहनावर कारवाई करीत रस्ते मोकळे केले होते. त्यांची पदोन्नती होऊन उपविभागीय पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाले. त्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले यांनी वाहतुकीवर लगाम ठेऊन रस्त्यावरील फळ, भाजीपाला गाड्यांसह वाहतुकीवर लक्ष देत वाहतूक नियंत्रित ठेवली होती. ठाणेदार सोनाजी आम्ले यांची बदली झाली. मध्यंतरी दिग्रस पोलिसांची या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा रस्त्यावर वाहन धारकांचे अतिक्रमण वाढले. रस्त्यावर वाहने, फळ, भाजीपाला विक्रेते यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

आता नव्याने आलेले ठाणेदार धर्मराज सोनुने रुजू होताच अवैध दारू विक्रेतेसह रस्त्यावरील अतिक्रमणावर लक्ष केंदित करीत वाहतुकीवर लगाम लावण्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. सद्या दिग्रस शहरातील वाहतुकीचा रस्ता मोकळा श्वास घेत आहे. अतिक्रमण केलेला रस्ता हा कायम मोकळा राहावा, अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे. रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस निरीक्षक धर्मराज सोनुने, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रत्नपारखी, कैलास घट्टे, उपनिरीक्षक विशाल बोरकर, देवानंद कायंदे, विनाश जाधव, अरुण जाधव, मदने, संतोष चव्हाण सह पोलिस सहकारी रस्त्यावर उतरून वाहन धारकांना व्यवस्थित वाहने लावण्यासाठी तंबी देत होते. या नंतर रस्त्यावर वाहतुकीस आपल्या वाहनांनी अडथळा निर्माण झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना पोलिसांद्वारे देण्यात आल्या.

यावेळी वाहतुकीचे नियम सांगण्यात आले. दारू पिऊन गाडी चालविताना आढळल्यास ड्रक अँड ड्राइव्ह नुसार कारवाई करण्यात येईल, दुचाकीवर तीन सीट आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीच्या वाढत्या चोरी लक्षात घेता वाहनांची तपासणी वेळोवेळी होणार आहे.तेव्हा वाहनधारकांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगावी असे आवाहन यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...