आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी ऋतुजा भोयर, जुवेरीया गोहर, समिक्षा भाले, समिक्षा होडगीर व विद्यार्थी ऋतिक राऊत यांनी भारी येथे गुलाबी बोंड अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गुलाबी बोंड अळी ही बोंडामध्ये असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही.
प्रादुर्भाव ग्रस्त भागातील कापूस पिकाची गळलेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत व कोणती कीटकनाशके वापरावी, याबद्दल माहिती दिली याचबरोबर उपयोगी कीटक व त्यांचे संवर्धन ( मधुमक्षिका, रेशीम किडा, लाख कीटक ई.) आणि अनुपयोगी कीटक व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन ( पांढरी माशी , मावा , तुडतुडे ई.) याबद्दल माहिती दिली.
प्रधान मंत्री फसल बिमा योजने अंतर्गत किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई करून मिळते म्हणून शेतकरी बांधवांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, असे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. या प्रात्यक्षिकाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू, कार्यक्रम अधिकारी एस. व्ही. महानुर, विषय तज्ञ संध्या भोयर, ए.एस. ढेंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.