आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या आनंदात भर घालणारा शंकर पट महोत्सवाला बुधवार दि. ८ मार्च रोजी सुरूवात झाली. जिल्हा किसान काँग्रेसच्या पुढाकाराने शहरातील बसस्थानक चौकात भरवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज शंकर पटाचे उद्घाटन माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी परिसरासह राज्यातील पट प्रेमींना शंकर पटाची मेजवाणी मिळणार असून विविध ठिकाणावरून आलेल्या सर्जा- राजाच्या जोड्या आपली कसब दाखविण्यासाठी सज्ज झालेले आहे. सलग दुसऱ्यांदा या लिगमध्ये समाविष्ट गुजरात टाईटन या संघात निवड झालेला तालुक्यातील नायगाव येथील शुभम विश्राम कापसे या खेळाडूचे शंकर पटात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री माणिकराव ठाकरे होते.
यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप, प्रविण देशमुख, राजेंद्र गायकवाड, अशोकराव घारफळकर, प्रा. भिमसिंगबाबु सोळंके, भय्यासाहेब देशमुख, कृष्णा कडू, बाभूळगावचे तहसीलदार विठ्ठल कुंभरे, पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, मोहन बनकर, वसंत घुईखेडकर, अतुल राऊत, बळवंतराव जगताप, नरेंद्र कोंबे, श्याम जगताप, श्रीकांत कापसे, रेणूका सोयाम, मंजुश्री नंदुरकर, प्रिती वानखडे आदींची उपस्थिती होती. विपरीत परिस्थितीतही शेतकरी वर्ग जगाला अन्नघालवित आहे. त्यांच्या परिश्रमाला सर्जाराजाची जोड आहे.
अशा सर्जाराजाला मैदानात आपली किमया दाखविण्यासाठी शंकर पटाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शंकर पटात बैतुल (मध्यप्रदेश) , वाशिम, भिडी जि. वर्धा, पुसद, घारफळ येथून बैल जोड्या आलेल्या आहे. शंकरपटासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष मोहन भोयर, उपाध्यक्ष शेखर अर्जुने, सचिव संजय गावंडे व त्यांची टिम परिश्रम घेत आहे. उद्घाटन सूत्रसंचालन प्रमोद गजभिये यांनी केले तर आभार अमोल कापसे यांनी मानले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.