आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक, हायस्कूलच्या शिक्षकांची करणार निवड:शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त अद्याप लांबणीवरच; आयुक्तालयात पाठवणार प्रस्ताव

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचा मुहूर्त यंदाही लांबणीवर पडला आहे. आयुक्तांच्या परवानगीशिवाय पुरस्कार वितरण होणार नाही. त्या अनुषंगाने सर्वाधिक गुणांकन असलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्तालयात मंजुरी करीता पाठविण्यात येणार आहे.

दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात येते. असे असताना मागिल काही वर्षांत प्राथमिक शिक्षण विभागाने आयुक्तांच्या परवानगीसाठी विलंब केला. परिणामी, पुरस्कार वितरण शिक्षण दिनी होवूच शकले नाही. त्यामुळे यंदा तरी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार वितरण होईल, अशी आस शिक्षकांना लागली होती. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून दहा प्राथमिक आणि तीन हायस्कूलच्या शिक्षकांची नावे पाठवावी, असे सोळाही गट शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशित केले होते. तद्नंतर एकूण १८६ नावे जिल्हास्तरावर पाठविण्यात आले होते, परंतू प्राथमिकचे सोळा, हायस्कूल दोन आणि एक दिव्यांग, असे मिळून १९ शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्तालयात मंजुरी करीता पाठविण्यात येणार आहे.

दरवर्षीच होतोय पुरस्कार वितरणाचा गोंधळ
गेल्या काही वर्षांपासून शिक्षक पुरस्कार वितरण शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर होतच नाही. सातत्याने निर्माण होणाऱ्या ह्या गोंधळावर यंदा तरी तोडगा काढल्या जाईल, अशी शक्यता होती. मात्र, यंदाही ऑनलाईन प्रस्ताव बोलावून गोंधळाची स्थिती कायम राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...