आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिषण अपघात:कार-ट्रॅक्टरच्या भीषण धडकेत ट्रॅक्टर उलटले; चालकाचा जागीच मृत्यू

दारव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कार आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक बसल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील लाखखिंड ते पळसी मार्गावर रविवार, ५ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. विकास बापूराव बरडे (३०, रा. पळशी) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

दारव्हा तालुक्यातील पळशी येथील विकास बरडे हा रविवारी दुपारच्या सुमारास ट्रॅक्टर घेवून जात होता. यावेळी लाखकडून पळशीच्या दिशेने जाणारी कारने (एमएच ०४, एचएन १५६७) समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला लाखखिंड ते पळसीजवळ धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालक विकास बरडेचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...