आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य:33 वर्षांपासून सामाजिक उपक्रमातून जनहित जोपासण्याची परंपरा कायम

दिग्रस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तुपटाकळी येथील महाराणा गणेश मंडळाची ३३ वर्षांपासून गणपतीची स्थापना करून सामाजिक उपक्रमातून जनतेचे हित जोपासण्याची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर, ७ सप्टेंबर रोजी नेत्रदान शिबिर व ८ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासह साहित्य वाटपाचा कार्यक्रम राहणार आहे. महाराणा गणेश मंडळ नेहमी गावातील सामाजिक सह वैयक्तिक अडचणीत हिरिरीने सहभाग घेऊन समस्या सोडवण्यास कटिबद्ध असतात. ३३ वर्षांपासून स्थापन झालेल्या महाराणा गणेश मंडळात आजही ९० च्या आसपास सदस्यगण कार्यरत आहे. त्यामधील अनेक सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, सैनिकासह खाजगी नोकरीमध्ये कार्यरत आहे.

महाराणा गणेश मंडळाच्या वतीने उत्सवादरम्यान रक्तदान, नेत्रदान शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटपासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला असून या सामाजिक उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले. मागील वर्षी २७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच भव्य राज्यस्तरीय क्रिकेटचे खुले सामने सुद्धा घेण्यात आले होते. अखेरच्या दिवशी भव्य अशी श्री गणेशाची मिरवणूक निघते. यामध्ये वारकरी संप्रदाय तुकडोजी महाराज, सांप्रदायिक सेवादास महाराज भजनी मंडळ, श्री दत्त भजनी मंडळ, महादेव भजनी मंडळ व तसेच महिला भजनी मंडळासह इतर भजनी मंडळाचा सहभाग असतो. या कार्यक्रमांमध्ये मंडळाचे सदस्य गौरव केळकर, सुमित देवरे, प्रमोद रोडे, केशव गायकवाड, अजय ठाकरे, संजय ठाकरे, मोहन खंदारे, मंगेश घरडेकर सह सर्व गावकरी मंडळींचा सहभाग असते.

बातम्या आणखी आहेत...