आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आदिवासी समाज बांधवांनी बिरसा मुंडांच्या विचारांचा वारसा जपावा; प्रकाश घोटेकर यांचे प्रतिपादन

यवतमाळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिरसा मुंडा हे आदिम जमातीचे जननायक असून त्यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा वारसा जपण्याचे काम आपण केले पाहिजे असे मत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे चे प्रकल्प संचालक प्रकाश घोटेकर यांनी यवतमाळ येथे व्यक्त केले.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत युनिसेक व्यवस्थापित वन हक्क व पेसा व आदिम जमाती (बहुल क्षेत्रातील) सूक्ष्म नियोजन केंद्राचे वतीने बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आदिम जमाती सेल चे क्षेत्र समन्वयक गंगाधर आत्राम, केंद्र समन्वयक रसूल शेख, आदिम जमाती चे केंद्र समन्वयक गणेश आत्राम, एकात्मिक आदिवासी प्रकल्प पांढरकवडा चे प्रकल्प समन्वयक अजय आत्राम, प्रदीप कुंभेकर आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिम जमाती व वन हक्क पेसा कार्यालयातील अधिकारी डेविड शिवणकर, सौरभ गुजर, बाबाराव आत्राम, दुर्गा किन्नाके, अमोल नगराळे, सुमेध भालेराव, तितिक्षा दंभे, वैभव पंडित, आकाश राऊत, सुरज राजकोल्हे, मोहसीन अली आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मुख्य प्रशिक्षक आकाश राऊत यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...