आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही दिवसांपासून विरोधकांना विनाकारण त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली नाहक मनस्ताप दिला जात आहे. या दडपशाही विरुद्ध उमरखेड काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने दि. १८ जूनला मशाली पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस कार्यालय उमरखेड येथे सायंकाळी ७ वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. खासदार राहुल गांधी यांनी सक्त वसुली संचालनालया मार्फत नोटीस दिली गेली होती. त्यानुसार ते १३ जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहिले. मात्र सक्त वसुली संचालनालय त्यांना दररोज बोलावून नाहक त्रास देत आहेत. सतत चौकशीसाठी बोलणे दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालने वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही सहभाग असल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले.
या दडपशाहीच्या निषेध करण्यासाठी शनिवार दि. १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कॉंग्रेस कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तातु देशमुख, काँग्रेसचे नेते गोपाल अग्रवाल, कृष्णा पाटील देवसरकर, माजी जि.प. सभापती रमेश चव्हाण, तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तराव शिंदे, युवराज पाटील देवसरकर, अॅड. जितेंद्र पवार, विरेंद्र खंदारे, सोनु खतीब, आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस कार्यालय येथे केंद्र सरकारच्या विरोधात मशाली पेटवून आंदोलन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.