आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला:त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली

दिग्रस13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील सिंगद जवळ असलेल्या एका पुलाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. त्या दरम्यान हा इसम उमरखेड येथील असल्याची माहिती मिळाली. पुसद रस्त्यावर असलेल्या सिंगद गावाजवळील पुलाखाली एक लाल शर्ट घालून असलेला ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.

या मृतदेहाच्या हातावर सचिन नाव गोंदलेले होते. सदर इसम हा उमरखेड येथील मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता सचिन वसंतराव देशमुख असल्याचे उघडकीस आले. मृत सचिन हा त्याच्या पत्नीकडे अकोला येथे गेला असल्याचे कळते. परंतु तो दिग्रस ते पुसद मार्गावरील पुलाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. नेमके मृत्यूचे कारण कळू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...