आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जलाराम सभागृहात घाटंजी पोलिस ठाण्याच्यावतीने शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, न्यायाधीश ए. ए. उतपात, ए. कळमकर, नगर पालिका मुख्याधिकारी अमोल माळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव, नायब तहसीलदार दिलीप राठोड, रुपेश सावरकर, पारवा ठाणेदार विनोद चव्हाण, वडगाव जंगल ठाणेदार पवन राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी ठाणेदार मनिष दिवटे यांनी केले. घाटंजी तालुक्याची पार्श्वभूमी व शांतपूर्ण शहराचे व तालुक्याचे माहिती सांगितले. सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे म्हणाले की, पुढील तीन महिने होणारे सण उत्सव रक्षाबंधन शेतकऱ्यांचा सण पोळा, गणेशत्सव व त्यात सतत पडणाऱ्या पाऊस यात सर्व सण शांतपणे साजरा करावे त्यात मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण उत्सव साजरा करण्यासाठी कडक निर्बंध होते.
त्यामुळे आता आनंदमय वातावरण व कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, गणेशमंडळाने धर्मदायमध्ये नोंदणी करावे, त्यामुळे वर्गणी दार यांच्यात वाद होणार नाही, गणेशमंडळांनी साऊंड स्टीटीम परवानगी घ्यावी, डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावी, त्यामुळे महिलांचा सहभाग वाढेल व संस्कृतीची जोपासना होईल, समाज उपयोगी कार्यक्रम घ्यावे, सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे साजरा करावेत, अन्य सूचना यावेळी देण्यात आल्या. घाटंजी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए.उतपात म्हणले की, समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्य समाजातील वंचित घटकाला मोफत सल्ल्या व मार्गदर्शन केले जातात, विधी सेवा समितीचे कार्य पोलिस व न्याय व्यवस्थित ताण कमी करणे हा उद्देश आहे. न्यायालयीन खटले कमी करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये न्याय व व्यवस्था शांतपूर्ण ठेवावे व लोक अदालत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे संचालन राजे छत्रपती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश उदार यांनी तर उत्कृष्ट रित्या आभार प्रदर्शन पारवा येथील ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले. या शांतता कमिटीला घाटंजी तालुक्यातील पत्रकार, सामाजिक व विविध पक्षाचे कार्यकर्ते घाटंजी, पारवा, वडगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील तंटा मुक्त समिती अध्यक्ष यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घाटंजी येथील उपनिरीक्षक विलास सिडाम, गोपनीय विभागाचे वामन जाधव, वाहतूक शिपाई कलीम कय्युम, घाटंजी पोलिस विभागातील सर्व कर्मचारी यांनी अतिशय चांगले नियोजनात सभा पार पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.