आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आगामी काळ हा आंबेडकरी गझलचाच असेल!‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी गझल आता‎ किशोरावस्थेत राहिली नाही. मराठी‎ गझल वाङ्मयाच्या आकाशात झेप‎ घेण्यासाठी ती आता सिद्ध झाली‎ आहे. त्यात उपयोजित केलेल्या‎ बाबासाहेबांच्या संस्कारस्वभावी‎ समर शब्दांनी ती ऊर्जा वर्धित‎ झाली आहे. या अंगभूत‎ मूल्यभानामुळे आगामी काळ हा‎ आंबेडकरी गझलचाच असेल असे‎ प्रतिपादन प्रमोद वाळके ‘युगंधर’‎ यांनी केले.‎ अ. भा. आंबेडकरी साहित्य‎ आणि संस्कृती संवर्धन‎ महामंडळाशी संलग्न ‘आशय’‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्थेतर्फे येथील भीम टेकडी‎ परिसरात रविवारी आंबेडकरी‎ गझल संमेलन पार पडले या‎ संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत‎ होते. मंचावर संमेलनाचे उद््घाटक‎ डॉ. इक्बाल मिन्ने, स्वागताध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्ञानेश्वर रोकडे, प्रमुख अतिथी‎ अशोक बुरबुरे, महामंडळाच्या‎ अध्यक्ष डॉ. सीमा मेश्राम-मोरे,‎ आशाताई थोरात, नंदकिशोर‎ दामोदर, महामंडळाचे निमंत्रक‎ प्रशांत वंजारे, प्रा. आरिफ शेख,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अनंत भवरे उपस्थित होते.‎ उदघाटक डॉ. इक्बाल मिन्ने‎ म्हणाले, आंबेडकरी गझल‎ नैसर्गिक आहे.

या गजलेत‎ बंधुभाव, न्यायप्रियता,‎ एकमेकांवरील प्रेम, सहिष्णुता,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एकमेकांचा आदर, नवसर्जन,‎ परिवर्तन, सलोखा, सौहार्द, कणव,‎ सामाजिक अभिसरण, वैज्ञानिक‎ दृष्टिकोन सहजपणे वावरताना‎ दिसतो. शरीरातील धमन्यांतून रक्त‎ जसे प्रवाहीत होत असते आणि‎ रक्ताचे अभिसरण होत असते‎ त्याचप्रमाणे आंबेडकरी गझल‎ समाजाच्या नसानसातून अभिसरण‎ होताना दिसते. आधुनिक जदीद उर्दू‎ गझल आणि आंबेडकरवादी गजल‎ एकमेकांना पूरक आहे. या दोघींनी‎ एकमेकांचा हात धरून अचूक मार्ग‎ निवडला तर साहित्यिक,‎ सामाजिक, आर्थिक विश्वातच‎ नव्हे तर राजकीय क्षेत्रातही फार‎ मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू‎ शकेल. यावेळी अशोक बुरबुरे,‎ आशाताई थोरात, डॉ. सीमा मेश्राम‎ यांनीही समयोचित विचार मांडले.‎ प्रास्ताविक रोशन गजभिये यांनी‎ केले. संचालन विजय वानखेडे तर‎ आभार राजेश गरूड यांनी मानले.‎

म्हणून या मंचाची उपलब्धता‎
महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकरांनी प्रतिपादन केलेला सांस्कृतिक संघर्ष प्रखर व्हावा, यासाठी‎ आणि आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत वैचारिक शिस्त अबाधित‎ राहावी, यासाठी साहित्य संमेलने महत्वाची भूमिका बजावतात. साहित्य‎ संमेलने ही केवळ संवादासाठी नव्हे तर मुक्त संवादासाठी असतात.‎ सरकारी मदतीच्या भरवश्यावर आयोजित होणाऱ्या संमेलनांना मर्यादा‎ येतात. ती संमेलने केवळ सोपस्कार बनून राहतात. म्हणूनच महामंडळाने‎ ‘आंबेडकरी गझल संमेलन'' हा मंच उपलब्ध करून दिला आहे‎.

बातम्या आणखी आहेत...