आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:मुलीचे अपहरण करुन नेणाऱ्या वाहनास पाठलाग करुन पकडले

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड राज्याच्या सीमेपासून मध्य प्रदेशातून एका मुलीला प्रेम प्रकरणात फसवून तीचे अपहरण करुन हैद्राबाद येथे नेत असलेल्या एका वाहनाचा पाठलाग करुन पांढरकवडा येथील चेकपोस्टवर सापळा रचत त्यांना ताब्यात घेण्यात आले. ही गौरवास्पद कामगीरी करंजी रोड येथे असलेल्या महामार्ग पोलिस मदत केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.

करंजी महामार्ग पोलिस केंद्रात नागपुर पोलिस नियंत्रण कक्षातून मॅसेज प्राप्त झाला. त्यात मध्य प्रदेशमधून एच आर २६ एजे ७५१९ हे राष्ट्रीय महामार्ग ४४ ने नागपुर येथून हैद्राबादकडे जात असुन ते वाहन तातडीने थांबविण्यात यावे. हा संदेश मिळताच करंजी महामार्ग पोलिसांनी नाकाबंदी लावली. मात्र संबंधीत वाहन जवळ येताच त्याने वाहनाची गती वाढवुन तो पुढे पसार झाला. त्यावरुप करंजी पोलिसांनी लगेच त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. यावेळी पांढरकवडा येथे असलेल्या टोल नाक्यावर फोन करुन काही वाहने रस्त्यावर थांबवुन ट्राफिक जाम करण्याच्या सुचना करंजी पोलिसांनी दिल्या. त्यासोबतच काही कर्मचाऱ्यांना तत्काळ त्या टोल नाक्यावर पाठवुन सापळा रचनला. या ठिकाणी संबंधीत वाहन पोहोचताच रस्त्यावर वाहने असल्याने त्यांचे वाहन थांबले. नेमक्या याचवेळी करंजी पोलिसांनी ते ठिकाण गाठून संबंधीत वाहन आणि लोकांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...