आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच मेळावा:गावातच उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून गावाचा विकास साधावा; मारेगाव येथे भास्कर पेरे पाटील यांचे प्रतिपादन

मारेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावाचा विकास साधण्यासाठी सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता गावातच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करा व यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून,गावाचा विकास साधावा असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यात आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. ते पुढे बोलत असतांना म्हणाले आपल्या गावातील माणूस शंभर वर्षे जगण्यासाठी गावाच्या सोयी सुविधां सह गावात स्वच्छतेवर, आरोग्यावर भर दिला पाहिजे. तसेच सरपंचाला गावाची आई झाल्या शिवाय गावातील गावाचा विकास साधता येणार नाही. असे त्यांनी सरपंच मेळाव्यात आपल्या आदर्श गावाचे वेगवेगळे उदाहरणे देवुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार होते, तर उद््घाटक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर होते. विशेष अतिथी म्हणून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर तर स्वागता अध्यक्ष म्हणून कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे होते. तर प्रमुख पाहुणे म्ह्णून अरुणा खंडाळकर, अनिल देरकर, माजी पं. स. सभापती शीतल पोटे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, कृ.उ.बा. समितीचे उपसभापती वसंतराव आसुटकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. देवा पाचभाई यांनी तर आभार तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी तालुका सचिव सुरेश लांडे, तालुका उपाध्यक्ष माला गौरकार, जगदीश ठेंगणे, प्रविण नान्हे, चंदु जवादे, सुरेखा चिकराम, पांडुरंग ननावरे, विनोद आत्राम, रविराज चंदनखेडे, प्रेमीला आदेवार, नीलिमा थेरे, दिलीप आत्राम, चंद्रकांत धोबे, शारदा गौरकार, वैशाली परचाके, आदींनी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...