आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:सिनेटच्या निवडणुकीत जिल्ह्यात जवळपास ३35 टक्के झाले मतदान

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत यंदा काट्याची टक्कर दिसत आहे. रविवार, दि. २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १५ केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडली. सायंकाळी उशीरापर्यंत जिल्ह्यातील एकूण केंद्रावर मिळून जवळपास ३५ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली. एकूण २०६ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून, मंगळवार, २२ रोजी मतमोजणी होणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीला यंदा चांगलीच रंगत आली आहे. विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह नुटा, शिक्षण मंच ह्या प्रमुख पॅनलच्या उमेदवारांनी भाग्य आजमाविले. यवतमाळ जिल्ह्यात सिनेट निवडणुकीच्या दृष्टीने एकूण १५ केंद्र होते.

शहरातील केंद्रावर ८९ वर्षाच्या वयोवृद्धाचे मतदान
शहरातील अणे महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावर ८९ वर्षीय रामचंद्र माधव शेंदुर्णीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. अमोलकचंद महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली. सन १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. यावरून मतदारांमध्ये चांगलाच उत्साह असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

संस्थाचालकांसाठी शिक्षक संघटनांची वज्रमुठ
सिनेट निवडणुकीत संस्थाचालकांच्या मतदार संघात चांगलीच काट्याची टक्कर झाल्याचे पहावयास मिळाले. मतदान प्रक्रीया सोपी आणि सुरळीत पार पडावी ह्याकरीता केंद्रावर दोन वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांसाठी भरपूर परिश्रम घेतले. काही संघटनांनी वज्रमुठे केल्याचे चित्र केंद्रावर पहावयास मिळाले.

बातम्या आणखी आहेत...