आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरी:वादळी वाऱ्यामुळे विवाहाचा मंडप उडाला; तीन वऱ्हाडी झाले जखमी

हिवरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने विवाह मंडप उडाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथे मंगळवार, दि. २९ मार्चला घडली. यात तीन वऱ्हाडी जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे लग्न मंडपातील लोखंडी खांब चक्क विद्युत तारेवर अडकले होते. यावेळी तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याचे मोठी हानी टळली.

यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी एका विवाह सोहळ्याकरिता भव्य असा मंडप पाहुण्यांनी भरला होता. यावेळी एक पाठोपाठ एक विधी करण्यास सुरुवात झाली. अशात अचानक वादळाने रौद्र रूप धारण केले आणि पहाता पहाता विवाहाचा मंडप आकाशात गवसणी घालताच एकच कल्लोळ उडाला. दरम्यान वऱ्हाडींची एकच धावपळ सुरू झाली. कुणी कुणाच्या अंगावर लाथा देत पळत होते. यात एक पाच वर्षीय चिमुकली जखमी झाली तर एक महिला व एक पुरुष जखमी झाले आहे. एक वऱ्हाडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या विवाहातील काही मंडप विद्युत तारेवर अडकला, तर काही गावातील घरांवर जाऊन पडला होता. मंडपाला लावण्यात आलेले लोखंडी पाइप तुटून पडले. कुणी कुणाल तुडवत स्वतः चढा जीव वाचवण्याचा जो तो प्रयत्न करीत होता. या विवाहाला जवळपास चारशेहून अधिक वऱ्हाड असल्याचे सांगण्यात येत आहे. पाहुण्यांसाठी तयार केलेले जेवण एकाच्याही पोटात पडले नाही, त्यांना उपाशी पोटीच परतावे लागले. ही बाब सर्वत्र वाऱ्या सारखी पसरल्याने मंडप चालकानी धाव घेत विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली.

बातम्या आणखी आहेत...