आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रम:स्त्री ही सक्षमच तिला गरज असते ती संधीची ; सांस्कृतिक कार्यक्रमात मिर्झापुरे यांचे प्रतिपादन

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री ही सक्षमच असते, तिला गरज असते ती संधीची. एकदा संधी मिळाली की, ती स्वत:ला सिद्ध करून दाखविते, असे मत भारतीय जनता पक्षाच्या सचिव व सामाजिक कार्यकर्त्या शैला मिर्झापुरे यांनी व्यक्त केले. त्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होत्या. आमदार मदन येरावार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील पोलिस मित्र सोसायटीत महिला सक्षमीकरण केंद्र सुरू आहे. त्या केंद्राच्या संचालिका शैला मिर्झापुरे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहे. महिलांना रोजगार निर्मितीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी योग, नृत्य व व्यायामाचे वर्ग घेतले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा उपक्रम राबविला जात आहे. महिलांचा विकास आणि ज्येष्ठांची सेवा सुरू आहे. गृहिणींसाठी नुकतेच नृत्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. त्या शिबिराची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात गृहिणी व तरुणींनी सहभागी होऊन विविध प्रकारची नृत्य सादर केली. स्त्रियांना संधी मिळाली तर त्या नक्कीच सोने करून दाखवितात. सांस्कृतिक कार्यक्रमात पहिला क्रमांक इरा ग्रुपच्या रुची आत्राम, स्वाती मिर्झापूरे, सुषमा येरावार, दीपा लिंगावार, गायत्री हिवरे यांच्या चमूला मिळाला. द्वितीय क्रमांक सखी ग्रुपच्या वर्षा धात्रक, मयुरी घुगल, ज्योती हिरुळकर, कल्पना पंचवटे, मृणाली पवार, अनुश्री बावणे, रवीना भारसाकळे यांनी पटकावला. तृतीय क्रमांक रोझ ग्रुपच्या मंजूषा घोलप, रेशमा पवार, आशा हटकर, अपर्णा इंगोले यांनी प्राप्त केला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक त्रिशिका ग्रुपच्या त्रिशिका गणवीर, हर्षदा पंधरे, तृप्ती गणवीर, जानवी राठोड, द्वितीय क्रमांक सुपर स्टार ग्रुपच्या स्वरांजली चरडे, तनिष्का इंगोले, परी देवस्कर, समृद्धी भोयर, खुशी शिंदे यांनी पटकावला. प्रोत्साहनपर बक्षीस सुहाना रोकडे, सोनाक्षी झाडे, राधिका भुरे यांना देण्यात आले. विशेष सहकार्य सुचिता रोकडे, स्वाती झाडे, रश्मी भुरे, डॉली जिग्यासी, शालिनी भांडवलकर, मीना फुलकर, कविता जोमदे, सविता जोमदे, कविता देशमुख, कविता सुरवार यांचे लाभले. परीक्षक म्हणून सरिता बाजनलावार, प्राप्ती चिंतावार यांनी काम पाहिले. विशेष उपस्थिती वर्षा गोटे यांची होती. मयूरी गदयी यांनी आभार मानले.

भाजपने व्यासपीठ उपलब्ध करून दिले ^गृहिणी असो की तरुणी त्यांना स्वत:च्या विकासासाठी व्यासपीठाची गरज असते. भाजपने महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यात सहभागी महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. शैला मिझापुरे, संचालिका, महिला सक्षमीकरण केंद्र.

बातम्या आणखी आहेत...