आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस तपास:उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटली; पारूबाई बाबुलाल जाधव असे मृत महिलेचे नाव

पुसद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपजिल्हा रुग्णालयात अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन वसंतनगर पोलिसांकडून केल्या जात होते. अखेर मृत झालेल्या महिलेची ओळख पटली असून ती सावरगाव बंगला येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील सकळी येथे जन्म गावी राहणाऱ्या पारूबाई बाबुलाल जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.

पारूबाई ह्या विठाळा वार्ड येथील पुलाच्या अलीकडे पावसाने भिजल्याने आजारी पडुन होत्या. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दि. १२ जूनला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी वसंत नगर पोलिसांनी मार्ग दाखल केला असून स्थानिक गुन्हे शाखेने महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन केले होते. अखेर मृत महिलेची ओळख पटली असून पारूबाई जाधव यांच्या विवाह नंतर सावरगाव बंगला येथे सासरी आल्या होत्या. पारूबाई मनोरुग्ण होत्या. त्या पुसद शहरात भटकून वास्तव्य करित होत्या. पुलाच्या अलीकडे आजारी पडून असलेल्या पारूबाईला रुग्णालयात भरती केले होते.

बातम्या आणखी आहेत...