आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण करणार; जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची ग्वाही

यवतमाळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ शहरातील नाट्यगृहाचे गेल्या २० वर्षापासून रखडलेले काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि येत्या २६ जानेवारीपासून यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांना आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यसाठी हक्काचा रंगमंच उपलब्ध होईल, अशी ग्वाही पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

यवतमाळ नगरपालिकेच्या ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’अंतर्गत नाट्यगृह बांधकामाचे पुनर्निमाण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नरगपरिषदेच्या प्रशासक माधुरी मडावी, माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी उपस्थित होते.

नाट्यगृह संकुलाचे उर्वरित शिल्लक स्थापत्य विषयक काम तसेच पाणी पुरवठ्याची कामे, बैठक व्यवस्था, एच.व्ही.एस.सी. आणि फायर फायटिंगची कामे, ऑडिओ आणि व्हीडीओची कामे, आतील व बाहेरील इलेक्ट्रिकलची प्रलंबित कामे व सौंदर्यीकरण यासाठी तीन कोटी ६७ लक्ष ४३ हजार रुपयांच्या प्रशासकीय निधीची आवश्यकता होती. यात २५ टक्के नगरपालिका व ७५ टक्के निधी जिल्हा नियोजनामधून उपलब्ध करण्यास मंजूरी दिली आहे. दर महिन्यात जिल्हाधिकारी व नगरपालिका यंत्रणा यांच्यासमवेत आढावा व पाठपुराव्यामुळे २० वर्षापासून रखडलेले नाट्यगृहामुळे जिल्ह्याच्या कला व सांस्कृतिक विकासात निश्चितच भर पडणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

मागील वर्षी यवतमाळचे पालकमंत्री म्हणून प्रभार स्विकारला आणि येथील विकास कामांना गती देण्याची काम हाती घेतले. यात सर्वप्रथम ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिला. तत्पर सेवेसाठी पोलिसांना वाहने उपलब्ध करून दिली. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा यंत्रणा आणि अद्यावत यंत्रसामग्री व मशनरी, तसेच तारांगण प्रकल्प, सावरगड डेपो हे सर्व विषय मार्गी लावले. अब्दुल कलाम अभ्यासिका सुरू केली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी म्हणाले की पालकमंत्री यांनी मागील वर्षी दिलेल्या सूचनेनुसार पाठपुरावा करून नाट्यगृहाच्या अपुर्ण कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करवून घेतले. पुढील पाच महिन्यात काम पुर्ण व्हावे म्हणून दर १५ दिवसाच्या कामांचे उद्दिष्ट ठरवून त्याचा आढावा घेण्यात येईल. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित नाट्यगृहाचा विषय निधी उपलब्ध करून मार्गी लावल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नाट्यगृहाची माहिती सादर केली तर माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, नीरज नखाते, कृषी बचत गटाचे सदस्य शेतकरी, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता वाय.देशमुख, डॉ. विजय अग्रवाल, तसेच इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते. मे अखेरपर्यंत अमृत पाणी पुरवठा सुरू होणार : शहरातील पाणी पुरवठ्याचे २०१७ पासून रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी मागील एक वर्षात नियमित आढावा घेवून पाठपुरावा केला. यामुळे या योजनेचे दोन टप्पे पुर्ण झाले असून तीसरा टप्पा एक महिन्यात पुर्ण होणार आहे. अमृत योजनेचे काम त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले असून मे अखेरपर्यंत पाणी पुरवठा सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...