आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट काम:दिग्रस ते दारव्हा मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; चिंचोली उतारातील नवीन रस्त्यावर पडले खड्डे

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस दारव्हा मुख्य रस्त्याचे काम जवळपास ६ वर्षांपासून संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष झाल्याने हा रस्ता जास्त काळ टिकेल यांची शाश्वती नसतांना यावर कोणत्याही अधिकाऱ्याच्या आवर नसल्याने मनमानी कारभार या रस्त्यावर केलेल्या कामावरून स्पष्ट दिसून येतो. कित्येक वर्षांपासून रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने हा रस्ता दोन्ही तर्फा खोदून वाहन धारकांना वेठीस आणले. प्रत्येक ऋतू मध्ये या रस्त्यावर वाहनधारकांचे बेहाल होऊन अनेक अपघात झाले. यामध्ये अनेकांना जीवाला मुकावे लागले. परंतु या रस्त्यांबाबत जसे पाहिजे तसे ठोस निर्णय न झाल्याने सामान्य प्रवाशांना वाहन चालवताना नाहक त्रास झाला. तारेवरची कसरत करीत प्रवाश्यांनी आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावर चालावे लागले. आज जवळपास ६ वर्ष लोटूनही हा रस्ता पूर्णत्वास न आल्याने अनेकांनी या गंभीर प्रश्नाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट दिसते. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम सुरू करतो. त्या कामात कोणतीही गुणवत्ता दिसून येत नाही तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याचे झालेल्या निकृष्ट कामावरून ठळकपणे दिसून येते. या रस्त्याच्या कामामध्ये कुठे तरी पाणी मूरत असल्याने कंत्राटदार मनमानी रस्त्याचे निकृष्ट काम करीत असल्याची सर्वत्र ओरड आहे. तालुक्यातील चिंचोली क्र २ उतारापासून तर दिग्रस पर्यंत झालेला रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार झाला आहे. नवीन तयार झालेल्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. नवीन रस्त्यात आतापासूनच रस्त्यावर खड्डे पडले असल्याने हा रस्ता अनंत काळ कसा टिकेल हा संशोधनाचा विषय ठरला आहे. मुख्य रस्त्याच्या कामात दोन मुख सिमेंट रस्ता पट्टा हा मशीनद्वारे सिमेंट माल टाकून तयार करण्यात येतो. तर त्या बाजूला उरलेला रस्ता रोज मजुरीचे काम करणारे मिस्त्री यांच्या सहाय्याने बाजूच्या पट्ट्या भरण्याचे काम करण्यात येत आहे. कुठे रस्ता खोदून ठेवला तर कुठे अर्धवट काम त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर काळजीपूर्वक वाहनधारकांना वाहन चालवावे लागते. जराही रस्त्यावर दुर्लक्ष झाले तरी अपघात होऊन जीव गमावण्याची वेळ या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित..!

बातम्या आणखी आहेत...