आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील धम्मचक्र बुद्ध विहार, चिंचोली क्र.२, येथे सोमवार, दि. २३ मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिबींबाची स्थापना करण्यात आली. यावेळी ताडोबा अभयारण्यातील संघरामागीरी विहाराचे भदंत ज्ञानज्योती महाथेरो आणि त्यांचा संघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भदंत आणि संघाचे आगमन झाल्या नंतर उपासक अमोल कानिंदे यांच्या घराजवळून मिरणुकीसह संघ वंदना म्हणत विहाराकडे निघाले. विहारात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर प्रतिबींबाची स्थापना करण्यात आली.जगाला बुद्धाशिवाय तर बुद्ध समजायला विपश्यनेशिवाय पर्याय नाही,असे भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी सांगितले. पुजनीय भिक्खूसंघाने परित्राण पाठ घेऊन उपस्थित उपासक व उपासकांना धम्मश्रवण, धम्माचे चिंतन करता यावे, धम्म जीवनामध्ये उतरवता यावा यासाठी पूज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी धम्मदेसनेला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी विपश्यनेचे मानवी जीवनात किती महत्व आहे. तसेच अंधश्रद्धा व कर्मकांडापासून कसे दूर रहावे, किमान प्रत्येक रविवारी परिवारासह विहारात जाण्याचे फायदे किती व कसे यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बोधिसत्व सहसंबंध कसे धम्म-संविधान लोकशाही यांचा सहसंबंध व व्याख्या तसे ते एकच असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील प्रत्येक घटकाला कसा न्याय मिळवून दिला यावर सुध्दा धम्मदेसनेतून प्रकाश टाकला. नंतर उपस्थित उपासक -उपासकांना भोजन देण्यात आले. भोजना नंतर संघदान, अष्टपुरस्कार दान देण्यात आले व मंगल मैत्री सह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बुद्धाचे प्रतिबिंब अष्टधातूचे असून, प्रतिबिंब पूज्य भदंत आगाधम्म कल्याण यांनी दान दिले आहे. तसेच सदर कार्यक्रमास मुंबई, दारव्हा, पुसद, उमरखेड व यवतमाळ येथून सुद्धा श्रद्धावान उपासक उपासकांनी उपस्थिती दर्शवून त्यांना दान, शील, भावना अनुभवयास मिळाल्याची प्रतिक्रिया आयोजन समितीजवळ व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समिती व उपासक व उपासकांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.