आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जिल्ह्यातील नवयुवकांनी कृषीपुरक उद्योगांच्या निर्मितीसाठी समोर यावे ; प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कृषी पुरक उद्योग, मत्सव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, तेलबिया प्रक्रिया, अन्नप्रक्रीया आदि क्षेत्रात रोजगार व उद्योग निर्मितीसाठी मोठा वाव आहे. तसेच उद्योग निर्मितीसाठी रोजगार निर्मिती योजना, आदिवासी क्षेत्रासाठी पोकरा योजना व इतर विविध विविध योजनेअंतर्गत उद्योगांना अर्थ सहाय्य केले जाते. याचा लाभ घेवून जिल्ह्यातील नवउद्योजकांनी उद्योग निर्मितीसाठी समोर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शेतकरी स्वावलंबन भवन येथे काल करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, माविमचे रंजन वानखेडे, उमेदचे नीरज नखाते, व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी महेश कुमार सीडाम, आयटीआयचे प्राचार्य प्रमोद भंडारे प्रामुख्याने उपस्थित होते. उद्यमिता प्रशिक्षण शिबिरात महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी तज्ञ मंडळींकडून उद्योगाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आपला उद्योग समोर नेण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचा व शासकीय योजना जाणून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चा माल मोठ्या प्रमाणात असल्याचे तसेच इतर उपलब्ध साधनसंपत्तीचा चांगल्या प्रकारे वापर करून उद्योग व रोजगार वाढवण्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हयातील नवउद्योजक तसेच बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

सामान्य मानसाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे व पारदर्शकपणे करण्यात येत आहे. शासनाच्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी परिसंवादाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या प्रमुख उपस्थितीसह योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी यावेळी गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, लहान मुलांच्या पोषणासाठी पोषण आहार योजना, आरोग्य सुविधेसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, अन्न धान्य पुरवठ्यासाठी प्रधानमंत्री ग़रीब कल्याण योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, हर घर नल योजना, जलजीवन मिशन योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना, घरकुल योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री मुद्रा योजना इत्यादी विविध योजना विविध यंत्रणामार्फत जिल्ह्यात अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी तसेच त्यात काय सुधारणा आवश्यक आहे, यासाठी लाभार्थींकडून अभिप्राय घेण्यात येत असल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांच्या विकासासाठी लाभार्थींचे अभिप्राय व शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचना नियोजनपूर्वक अंमलात आणण्याचा संकल्प कार्यकारी यंत्रणेने करण्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अशोक उईके यांनी प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेचा लाभ जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना झाला असल्याचे व केंद्र शासनाच्या सर्व योजना जिल्ह्यात चांगल्याप्रकारे राबवल्याबद्दल प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजना व नरेगा योजनांची माहिती दिली तर जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी पुरवठा विभागाच्या योजनांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून राज्य शासन व केंद्र शासन यांच्या योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत व्यवस्थितपणे पोहचतो काय याचे पर्यवेक्षण जिल्हा प्रशासनाद्वारे वेळोवेळी करण्यात येत असते, याबाबत लाभार्थींच्या अडचणी जाणून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी प्रभु पांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध प्रशासकीय यंत्रणेचे विभाग प्रमुख, केंद्रीय योजनेचे लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...