आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चढवली:महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावर तरुणाने दुचाकी चढवली; बसस्थानक परिसरातील घटना, वाहतूक शाखेतील महिला कर्मचारी जखमी

पुसद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसस्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावर एका दुचाकीस्वाराने भरधाव दुचाकी चालवली. महिला कर्मचारी जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयातथ दाखल करण्यात आले आहे. ही घटना २ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. गणेश बंडु तांबडे (२०) रा. पारवा असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड उप वाहतूक शाखेतील महिला पोलिस कर्मचारी छाया खंदारे या शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर सोमवारी सकाळी कर्तव्य बजावत होत्या. यावेळी पारवा येथे राहणाऱ्या युवकाने दुचाकी क्रमांक एमएच २९-बीसी-०२६४ भरधाव वेगाने चालवून छाया खंदारे यांच्या पायावर चढवली. यात त्या जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेवून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दुचाकीस्वार तरुणावर पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

बातम्या आणखी आहेत...