आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लूटमार:चाकू लावून युवकाला लुटले

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदणी येथून यवतमाळकडे येत असतांना एका दुचाकीस्वाराला दोघांनी वाटेत अडवून चाकूच्या धाकावर लुटले. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास शहरातील गोदणी मार्गावर असलेल्या ऑक्सिजन पार्क परिसरात घडली. मात्र अवधुतवाडी पोलिसांनी लूटमारीची तक्रार न घेता मोबाईल हरवल्याची नोंद घेवून त्याला रवाना केले.

शहरातील सिंघानियानगरातील परिमल डाखोरे हा युवक शनिवारी गोदणी येथील एका व्यक्तीकडे मोबाईल फोन नेवून देण्याकरता गेला होता. त्या ठिकाणाहून परत येत असतांना गोदणी मार्गावरील ऑक्सिजन पार्क परिसरात दुचाकीस्वार दोघांनी परिमल याला अडविले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवित त्याच्या जवळील मोबाईल फोन आणि अडीच हजार रूपयाची रोख हिसकावून घेतली.

बातम्या आणखी आहेत...