आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:उपवनसंरक्षक निवासस्थान परिसरात चंदन झाडाची चोरी ; शहर पोलिस ठाण्यात तक्रार,चोरीची दुसरी घटना

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपवनसरंक्षक यांच्या निवासस्थान परिसरातील एक ते दीड लाख रूपयांच्या दोन चंदनाच्या झाडावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. ही बाब बुधवार, दि. ८ जून रोजी उघडकीस आली. त्यावरून उपवन संरक्षक तुषार राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उपवन संरक्षक यांचे निवासस्थान आहे. या परिसरात चंदनाचे दोन झाड होते. या झाडावर अज्ञात चोरट्याने २३ मे ते दि. ८ जून रोजीच्या दरम्यान हात साफ केला. परिसरातील दोन्ही चंदनाचे झाडे आरीच्या सहाय्याने कापून चोरट्यांनी कापून नेले. दरम्यान, बुधवार, दि. ८ जून रोजी ही बाब निदर्शनास येताच उपवन संरक्षक तुषार पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविराधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवी कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच चंदन तसेच सागवान चोरीच्या वेगवेगळ्या दोन घटना घडल्या होत्या. या प्रकरणी सुद्धा पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती, परंतू चंदन, सागवान चोरटे पोलिसांच्या हाती लागलेच नाही. आता तिसरी घटना घडल्यामुळे चंदन चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

ठेकेदारांची तपासणी करणे गरजेचे जिल्ह्यात सागवान खरेदी, विक्री करणाऱ्या ठेकेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याचकडे चोरटे चंदन विक्री करीत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरासह आजुबाजुच्या परिसरातील ठेकेदाराला पोलिसी हिसका दाखवल्यास चोरट्यांचा सुगावा लागण्याची शक्यता आहे. हा छोट्या आकारमानाचा उष्ण कटिबंधीय वृक्ष आहे. याचे खोड सुगंधी आणि थंड असते. मूलतः भारतीय उपखंडातून उद्भवलेला हा वृक्ष आता इतर आठळतो.

बातम्या आणखी आहेत...