आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार दाखल:..तर मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करू : पवार

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गेल्या काही दिवसांत बिकट झालेला आहे. त्याशिवाय इतर अनेक समस्या शहरात आ वासून उभ्या आहेत. या सर्व समस्या येत्या सात दिवसांत पालिका प्रशासनाने निकाली काढाव्या अन्यथा त्यानंतर आम्ही थेट पोलिस ठाण्यात जाऊन मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करू, असा इशारा देवानंद पवार यांनी दिला. मंगळवारी विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

देवानंद पवार म्हणाले, की यवतमाळ नगर पालिका अ दर्जाची नगर पालिका असतानाही शहर मागासलेले दिसून येते. स्वच्छता, पाणी, रस्ते अशा मुलभूत सोईसुविधाही नागरिकांना मिळत नाही. असे असतानाही पालिका मुख्याधिकारी त्या समस्येकडे लक्ष न देता एका विशिष्ट पक्षाचे असल्यासारखे वागत असून स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पवार यांनी केला. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, जावेद अन्सारी, माजी नगरसेवक प्रा. डॉ. बबलू देशमुख, वैशाली सवाई, छोटू पावडे, पल्लवी रामटेके आदी उपस्थित होते.

वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू
पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. शहरातील कचरा, मोकाट जनावरांमुळे सामान्य यवतमाळकरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याच कारणासाठी शहर काँग्रेसतर्फे पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे. यानंतरही पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास त्या संदर्भात वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू.- जावेद अन्सारी, माजी नगरसेवक, काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...