आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम‎ तत्काळ थांबवण्याची मागणी:चार लाख रुपयांच्या रस्त्यात डांबराचा‎ पत्ताच नाही; ठेकेदाराची मनमानी‎

पुसद‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेच्या हद्दीतील शनी‎ मंदिरासमोरून ते दूरभाष‎ केंद्रापर्यंतच्या रस्त्यामध्ये‎ ठेकेदाराकडून हलगर्जीपणा केला‎ जात आहे. रस्त्याचे डांबरीकरण‎ करताना ठेकेदाराने सर्व नियम‎ धाब्यावर बसवल्याचे वास्तव समोर‎ येत आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराला‎ काळ्या यादीत टाकून रस्त्याचे होत‎ असलेले डांबरीकरणाचे काम‎ तत्काळ थांबवण्याची मागणी‎ नागरिकांकडून होत आहे.‎ नाजीम नामक ठेकेदाराने‎ नगरपालिकेच्या हद्दीतील जवळपास‎ पाचशे ते सहाशे मीटर लांबीचा‎ डांबरीकरण रस्ता तयार‎ करण्यासाठी चार लाख रुपयांचा‎ ठेका मिळवला आहे.‎

नगरपालिकेच्या बोटावर‎ मोजण्याइतक्या अधिकारी,‎ लिपिकाला हाताशी धरून ठेका‎ मिळवल्याचा आरोप नागरिकांकडून‎ होत आहे. ठेकेदाराने मनमर्जी करत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सर्व नियम धाब्यावर बसवून‎ डांबराचा अत्यल्प वापर केला आहे.‎ रस्त्यावर डांबर न टाकताच गिट्टी‎ पसरवली आहे. नुसती गिट्टी‎ टाकल्याने ती बाहेर निघत असून,‎ ये-जा करणाऱ्यांसह दुचाकी‎ वाहनचालक स्लिप होऊन अपघात‎ झाल्याच्या घटना घडल्या आहेत.‎ यापूर्वी देखील नाजीम नावाच्या‎ ठेकेदाराने तुकडा पद्धतीने महात्मा‎ फुले चौक ते वसंतराव नाईक चौक‎ दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले होते.

तो रस्ता देखील निकृष्ट‎ केल्याच्या तक्रारी त्या वेळेस झाल्या‎ होत्या. तरी देखील पुन्हा एकदा‎ त्याच ठेकेदाराला नगरपालिकेने‎ ठेका दिल्याने नागरिकांकडून रोष‎ व्यक्त होत आहे. त्यामुळे‎ मुख्याधिकारी डॉ. किरण‎ सुकलवाड यांनीच जातीने लक्ष‎ देऊन, अशा ठेकेदाराला काळ्या‎ यादी टाकून त्यांच्याकडून तत्काळ‎ काम थांबवण्याची मागणी‎ नागरिकांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...