आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओच्या 58 सेवा ऑनलाइन:बहुतांश कामांसाठी आता आरटीओ कार्यालयात स्वत: जाण्याची गरज नाही

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी तसेच इतर बहुतांश कामांसाठी आता आरटीओ कार्यालयात स्वत: जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित ५८ सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात नुकतीच नवीन अधिसूचना जारी केली आहे. आरटीओला देण्यात येणाऱ्या काही सुविधा या डिजिटल करण्यात आल्यात. मात्र या ऑनलाइन सुविधांचा उपयोग करण्यासाठी आधार पडताळणी करणे आवश्यक आहे.

नागरिकांना सोयीस्कर आणि त्रास-मुक्त सेवा देण्यासाठी भर देण्यात आला आहे. अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना संपर्क विहीन सेवा मिळण्यासाठी आधार आवश्यक आहे. आपण फक्त parivahan.gov.in वर जाऊन आपले आधार कार्ड व्हेरिफाय करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण या सर्व सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम असाल. या ऑनलाइन सेवा स्मार्ट फोनद्वारे मिळण्यास मात्र अनेकदा अडचणी येत असल्याचे काही नागरिकांचे म्हणने आहे,

सुविधांचा ऑनलाईन लाभ घेता येईल
आरटीओच्या बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र कायमस्वरूपी वाहन परवाना देण्यापूर्वी संबंधिताला आरटीओमध्ये येऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. मात्र इतर अनेक सुविधांचा ऑनलाइनच लाभ घेता येईल.
ज्ञानेश्वर हिरडे, आरटीओ

बातम्या आणखी आहेत...