आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात राज्य शासनाला दिलेला अल्टीमेटम ३ मे रोजी संपला आहे. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांमधुन नियमबाह्य अजान होवु नये आणि त्याचे पडसाद कुठेही उमटु नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी म्हणुन संपुर्ण जिल्ह्यातील मशिदीपुढे पोलिसांचा ३ मे ला रात्रभर बंदोबस्त लावण्यात आला होता.
दुसरीकडे भोंग्यांसाठी परवानगी अनिवार्य झाल्याने सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व ३२ पोलिस ठाण्यात परवानगी घेण्यासाठी विविध मशिदींचे मौलवी आणि ट्रस्टी यांची गर्दी झालेली दिसुन आली. दुसरीकडे कुठल्याही मशिदीपुढे हनुमान चालीसा पठण होवू नये यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची संपुर्ण जिल्ह्यात धरपकड सुरू करण्यात आली होती.
यवतमाळ जिल्ह्यातील मशिदींवरील भोंगे सुरू ठेवण्याची पोलिस ठाण्यात मौलाना, इमाम यांनी परवानगी मागितली. न्यायालयाचा मान ठेवतो, त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता आणि नियमाचे पालन करणार असल्याचेही यावेळी उपस्थित इमाम आणि मौलाना यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, अवधुतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.