आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफार्मसी कौन्सील ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. मोन्टुकुमार पटेल यांनी २४ जानेवारी रोजी वाधवाणी फार्मसी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी महाविद्यालयातील ‘सेमीनार हॉल’मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना आगामी काळात औषधनिर्माण शास्त्र विषयात अमुलाग्र बदल होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, महाविद्यालयाचे अध्यक्ष जगदीश वाधवाणी, प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. भुषनकुमार साठे, प्राचार्य डॉ. मनिषा किटकुले उपस्थित होते. डॉ. मोटुकुमार पटेल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना पीसीआयची कार्यप्रणली, उद्दीष्टे व भविष्यातील कार्यपद्धती यावर प्रकाश टाकला त्यांनी बी फार्म अभ्यास क्रमात विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार स्पेशल विषयाचा अंतर्भाव करण्याचा माणस व्यक्त केला. जेणेकरून त्यांच्या इच्छेनुसार बी फार्म तृतीय वर्षात इंडस्टी, टीचीग क्लिनीकल रीसर्च, कमोडीटी रिलेटेड विषय घेवुन आपले करिअर निश्चीत करू शकतील तसेच पीसीआय हे कम्युनिटी फार्मसीस्ट ला सशक्ती करण करण्यास कटिबद्ध असून नव नवीन योजना कार्यान्वित होतील असे सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका डॉ. शिल्पा गावंडे यांनी केले.
भेटी दरम्यान त्यांनी कॉलेजची पाहणी केली असतांना कॉलेजच्या कॅम्पसची स्वच्छता, डीजीटल क्लॉसरूम, सेमिनार हॉल, लायब्ररी, अॅनिमल हॉउस, कॅड लॅब यांच्या व्यवस्थेबद्दल तसेच महाविद्यालयात असलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा, अॅमीनिटीज, सेंट्रल इन्स्टुमेंन्ट रूम, कंप्युटर लॅब इत्यादी उत्कृष्ट शैक्षणिक सुविधांबद्दल महाविद्यालयाची प्रशंसा केली.
महाविद्यालयीन उपस्थित प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांनी समाजोपयोगी संशोधन करून त्यांचे पेमेंट प्राप्त करण्याकरता प्राध्यापकांना प्रोत्साहीत केले तसेच औषध कंपन्यांसोबत संशोधनाकरिता करार करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी भेटी दरम्यान संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाधवाणी व प्राचार्य डॉ. अ. वि.चांदेवार यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यासाठी उपलब्ध केलेल्या सोई सुविधांबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच पेमेंट प्राप्त शिक्षकांचेही अभिनंदन केले. यवतमाळ सारख्या छोटयाशा आदिवासी बहुल जिल्ह्यात फार्मसी महाविद्यालय सुरू करून परिसरातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र शिक्षण उपलब्ध करून दिले. महाविद्यालयास प्राप्त विविध पुरस्काराबद्दल तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदिश वाधवाणी व प्राचार्य डॉ. अ. वि. चांदेवार यांचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.