आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिनेस्टाईल आलेल्या आरोपींनी चाकूच्या धाकावर एका चौकीदारासह त्याच्या साथीदारांचे हात पाय बांधून चक्क ३२ लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारेवर डल्ला मारला. दहा ते अकरा चोरट्यांनी मिळून टाकलेल्या या दरोड्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कानडा शेत-शिवारात मंगळवार, ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी प्राप्त माहिती नुसार, तालुक्यातील कानडा शेत-शिवारात के.ई.सी. इंटरनॅशनल लिमिटेड एस. बी. यू. साऊथ एशिया कंपनी द्वारे ७६५ के. व्ही. डी. सी. वरोरा ते वारंगल दरम्यान टॉवर प्रोजेक्टचे काम सुरू आहे. आलम बाबर अली (२३) रा. कुमरगंज पश्चिम बंगाल व त्याचा साथीदार जलील अली हे दोघे या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या देखरेखेसाठी चौकीदार म्हणून काम करतात. मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता दरम्यान ते दोघे चौकीदार म्हणून काम करीत असताना त्या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती अचानक आले. त्या दोघांनी दोन्ही चौकीदारांना पकडून हात पाय दुपट्ट्याने बांधले.
त्यानंतर त्यांच्याकडील मोबाइल मागितले, आलम अली यांनी मोबाइल देण्यास नकार देताच चोरट्यांनी चाकू व पेचकचच्या जोरावर मारुन टाकण्याचा धाक दाखवत गालावर थापडा मारत मोबाइल हिसकावला आणि त्यातील सिमकार्ड काढून फेकून दिले व झोपडीत असलेल्या बॅगमधील २ हजार रुपये आरोपीने आपल्या खिशात टाकले व घटना स्थळापासून १०० मीटर अंतरावर त्यांना हात पाय बांधून ठेवले. दरम्यान, काही वेळातच घटनास्थळी दोन दहा चक्का ट्रकमधून ८ ते ९ अनोळखी चोरटे खाली उतरले. त्यांच्यापैकी एकाने साइडवर असलेले हैड्रॉ (क्रेन) सुरू करुन त्याच्या साह्याने साइडवर असलेल्या मौल्यवान ऍल्युमिनियम तार वाईंडींग केलेले ३ टन वजनाचे ८ ड्रम बंडल असे एकूण २४ टन ऍल्युमिनियम तारांच्या ड्रम ट्रक मध्ये चढवून चोरटे पसार झाले.
या घटनेनंतर चौकीदार व त्याच्या साथीदाराने कशी बशी सुटका करून घडलेला प्रकार ठेकेदाराला सांगितला. दरम्यान, आलम अली याने मारेगाव पोलिस स्टेशन गाठून अनोळखी चोरट्यां विरुद्ध तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी या दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मारेगाव पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.