आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या पंचायत समितीच्या गोदामातून शासकीय योजनेच्या शेकडो लोखंडी शेगड्या चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना रविवार, दि. १८ डिसेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी एलसीबी पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून त्या शेगड्या जप्त केल्या आहे.
अजय तेलंग (२८), अतुल चांदेकर (२५) दोघेही रा. आठवडी बाजार, यवतमाळ, राजेंद्र मातनकर (३०) रा. शिवनी घाटंजी, सचिन मेश्राम (२०) रा. अकोला बाजार आणि शेख हाफीज शेख हसन (२८) रा. डेहनकर ले-आऊट, यवतमाळ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे.
तहसीलसमोर असलेल्या जुन्या पंचायत समितीच्या इमारतीत विविध साहित्य ठेवण्यासाठी एक गोदाम होते. त्यात शासकीय योजनेच्या शेकडो लोखंडी शेगड्या, सौर पॅनल
अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही शासकीय योजनेच्या लोखंडी शेगड्या लंपास करणाऱ्या चोरट्यांना एलसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. साधारणत: अडीच ते तीन तास पोलिसांना ताटकळत रहावे लागले. यावरून प्रशासकीय अधिकारी किती सजग आहे, याचा प्रत्यय येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.