आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकी आणि चारचाकी वाहनांसह अन्य मोठ्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा दि. १ जून महाग झाला आहे. त्यामुळे गाडी मालकांना आता अधिक हप्ता भरावा लागेल. भारतीया विमा नियामक व विकास प्राधिकरणाने विम्याचे दर वाढवण्यास परवानगी दिली आहे. वाहनधारकांना आता थर्ड पार्टी वाहन विम्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तथापि, शैक्षणिक संस्थांच्या बसेस, व्हिंटेज कार, इलेक्ट्रिक वाहने आणि हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांना प्रीमियम मधून सूट देण्यात आली आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाशी सल्लामसलत करून मोटार वाहन नियम प्रकाशित केले आहेत. नव्या नियमानुसार एक हजार सीसीच्या खासगी कारचा थर्ड पार्टी विम्याचा दर दोन हजार ९४ रूपये करण्यात आला आहे. १५०० सीसीच्या खासगी कारसाठी दर तीन हजार ४१६ रूपये करण्यात आलो आहे.
दंडात्मक कारवाईची तरतूद ^नियमानुसार वाहनांचा विमा काढणे आवश्यक आहे. विना विमा वाहन रस्त्यावर आढळल्यास अशा वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईची तरतूद प्रस्तावित आहे. ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.