आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:यंदा रामनवमी शोभायात्रेत अयोध्या मंदिर प्रतिकृतीचे असणार आकर्षण

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयोजित करण्यात आली नाही. मात्र कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने येत्या रविवारी रामनवमी शोभायात्रेत अयोद्धेच्या राममंदिराची प्रतिकृती, केरळचे वाद्य संच मुख्य आकर्षण राहणार आहे. याकरीता राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती झटत असल्याचे राम लोखंडे यांनी बुधवार, दि. ६ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. शोभायात्रा जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून दुपारी ४ वाजता शोभा यात्रेला सुरवात होणार आहे. यंदा नवीन कलाकृतीसह साकारण्यात येणाऱ्या आकर्षक अशा सुशोभित राम रथ पिंटू पिंपळकर साकारत आहे. शोभायात्रा मार्गावर कलावंत सचिन मानेकर यांनी साकारलेल्या प्रभु श्रीराम व हनुमानाच्या दहा फुट उंच मुर्ती शोभा यात्रेचे आकर्षण असणार आहे. सोबतच नस्करापार्डी येथील भजनी मंडळ, डॉक्टर्स असोसिएशनची व्यसनमुक्ती या विषयावरील झाँकी सोबतच ९० च्या वर झाकी सहभागी होणार आहे. शोभायात्रा मार्गावर रांगोळी, भगवे ध्वज, पताका लावण्यात येणार असून भजन गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

शोभायात्रेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून सुरक्षा समितीत बजरंग दलाच्या पाचशे सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. रविवारी सकाळी मोटारसायकल प्रभात फेरी होणार आहे. शोभायात्रेत सहभागी झाँकीमधील उत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगीतले. यावेळी प्रदीप कटाटे, गौरव, संतोष हरणखेडे, मनिष भिसेन, अमोल ढोणे, अभिजित ठोंबरे, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...