आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:त्या विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा!

उमरखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यातील अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान १३ व १४ तारखेला सुट्टी जाहीर केली होती. प्रत्यक्षात मात्र, विद्यार्थ्यांना अनुपस्थित दर्शवून अनुत्तीर्ण केले होते. ह्या संदर्भात स्वाती नामक विद्यार्थिनीने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्याकडे दाद मागितली होती. या प्रकरणात भुतडा यांनी शिष्टाई करीत त्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याची विनंती विद्यापीठास केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून, आता त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

१० ते १५ जुलै या काळात देखील मुसळधार पाऊस होता. त्यावेळी महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू होत्या. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्या कालावधीत सुट्टी जाहीर केली होती. स्वाभाविकच शाळेला सुट्टी जाहीर झाल्याने नदी नाल्यांमुळे अडकलेल्या परीक्षार्थींनी सुटकेचा निश्वास सोडला. तर शहरी भागातील परीक्षार्थी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली सुट्टी असल्याने पेपर बद्दल निश्चिंत झाले होते. दरम्यान, सुट्टीच्या तारखेला असणारे पेपर पुन्हा घेतल्या जातील अशी सर्वांची खात्री झाली होती.

मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या अमरावती विद्यापिठाच्या निकालाने हा आनंद हिरावून घेतला. सुट्टी जाहीर केलेली असतांना परीक्षार्थ्यांना अनुपस्थित ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले. प्रशासनाची भूमिका थेट परीक्षार्थींच्या भविष्यावर उठल्याने उमरखेड तालुक्यातील साखरा येथील स्वाती वानखेडे नामक विद्यार्थिनीने सर्व मित्रासह हा प्रकार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या कानावर घातला. भुतडा यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेवून अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू, सिनेट सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी, उत्पल टोंगो यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला. आता अनुपस्थित दर्शवत अनुत्तीर्ण केलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सप्टेंबर महिन्यात पुन्हा परीक्षा देतील.

बातम्या आणखी आहेत...