आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व शासकीय कार्यालय:हजारो नागरिकांनी एकाच सुरात गायले राष्ट्रगीत ; जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. यात प्रामुख्याने दहा हजार लोकवस्तीच्या ढाणकी नगरपंचायत क्षेत्रात तब्बल सात हजार नागरिकांनी समूह राष्ट्रगीत गायन केले.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस मुख्यालय, सर्व शासकीय कार्यालये, सर्व तहसील, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खासगी आस्थापना यासह विविध ठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या समुह राष्ट्रगीत गायनासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. बचत भवन येथे समूह राष्ट्रगीत गायन प्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी वऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, संगीता राठोड, उपस्थित होते.

समूह राष्ट्रगीत गायनात सहभाग
स्थानिक जुन्या बस्थानकावरील शिवाजी चौकात बुधवार, दि. १७ ऑगस्ट रोजी ठिक ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायनात सहभाग नोंदवला. या प्रसंगी कस्तुरबा गांधी कन्या शाळा, आश्रम शाळा, हानिफ स्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुलाबसिंह ठाकुर शाळा, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल, मधुकरराव नाईक मुक बधीर विद्यालय, स्वामी पेंडसे गुरूजी विद्यालय, स्वामी थावराजी नाईक अपंग विद्यालय, ढाणकीतील छोटे मोठे व्यापारी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, कर्मचारी, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, असंख्य नागरिकांसह ढाणकीतील शिवाजी चौकातील गांजेगाव, बिटरगाव, उमरखेड रोड आणि शहरात जाणाऱ्या चौरस्त्यावर विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक, व्यापारी संघ, पत्रकार संघ, ढाणकीच्या नागरिकांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...