आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा५० लाखाची मागणी पूर्ण न केल्यास कुटुंबीयांतील एका सदस्याची हत्या करण्यात येईल, असे पत्र पोस्टाने आल्याचे घाटंजी शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवार, दि. २ ऑगस्टला समोर आली असून या प्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात दि. ४ ऑगस्टला गुन्हे नोंद करण्यात आले आहे.घाटंजी शहरातील जगदंबा नगरीतील गजानन ढवळे यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनूसार, गजानन ढवळे यांना मंगळवार, दि. २ ऑगस्टला पोस्टमनने एक लाल रंगाने बंद पाकीट दिले.
त्यामध्ये गडचिरोली नक्षल दंगल कमांडर क्रमांक ३८ हे असून त्यात हिंदीत गजु ढवळे आपको लाल सलाम तुम्हाला सुचीत करण्यात येते की, तुम्ही मला ५० लाख रूपये द्या, नजर अंदाज केल्यास आपल्या परिवारातील सदस्याला जिवाने मारण्यात येईल, असे लिहून होते. तसेच त्या खाली दि. १२ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी ८.३० वाजता उमरी ते करंजी रोड पासून ३ किमी अंतरावर हनुमान मंदिराजवळील दर्गाच्या मागे ५० लाख रूपये ठेवा अशी धमकी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.