आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:लाच धमकी:बनावट अकाऊंटवरून स्वत:लाच दिली मारण्याची धमकी ; वडिलाचा विरोध असल्याने मुलानेच रचला कट

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांना व मुलाला मारुन टाकण्याच्या धमक्या एका अनोळखी युवकाकडून एका परिवारास देण्यात येत होत्या. प्रकरण जास्त गंभीर झाल्याने पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचली. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. त्यात बाहेरगावी शिक्षण घेण्यासाठी जाण्यास वडील मज्जाव करत असल्याने, त्यांच्या अल्पवयीन मुलानेच एका समाज माध्यमावर बनावट खाते तयार करुन हा सर्व धमक्यांचा प्लान रचल्याचे उघड झाले. त्यावरुन मुलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्णी शहरात राहणारा एक व्यक्ती २९ फेब्रुवारी रोजी घराच्या परिसरात फीरत होते. यावेळी दुचाकीवरून आलेला एक तरुण त्यांच्यापुढे थुंकला, व पळून गेला. मात्र त्यानंतर ३ मे रोजी फिर्यादीच्या बहिणीने फोन करुन कुणीतरी तुझ्या श्रद्धांजलीची पोस्ट माझ्या अकाउंटवर टाकली असल्याचे सांगितले. त्यावर कुणी गंमत केली असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी विनय टाके नामक व्यक्तीने फिर्यादीच्या पोस्ट करुन तुला शिव्या खुप महागात पडणार १० मे पर्यंत तुझ्या मुलाचा गेम करणार अशी धमकी दिली. ही धमकी वाचताच फिर्यादीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा फेसबुकवर मेसेज करुन २९ फेब्रुवारी आठवते का, मी तुझ्या अंकावर थुका उडवला आणि तू मला शिव्या दिल्या. आता त्या शिव्यांचा बदला तुझा मर्डर अशी धमकी दिली. त्यानंतर विनय टाके याच्या नावाचे अकाऊंट बंद झाले. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने फेसबुकवर फिर्यादी आणि त्याच्या मुलास मारण्याच्या धमक्या येवु लागल्या. त्यांच्या नातेवाइकांच्या अकाऊंटवरही खुन करण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या या धमक्या येत होत्या. त्यामुळे अखेर फिर्यादीने आर्णी पोलिस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेताच हे प्रकरण सायबर सेलकडे वळवण्यात आले. सायबर सेल आणि आर्णी पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या काही दिवसातच तपास पुर्ण केला. त्यात तक्रारदार यांचा मुलगा याने स्वत:च ही सर्व बनावट अकाऊंट तयार करुन त्याच्या वडीलांना आणि स्वत:ला मारण्याच्या धमक्या दिल्याची गंभीर बाब पुढे आली. मला बाहेरगावी शिक्षणासाठी जायचे आहे आणि वडील त्यास नकार देत होते. आर्णीमध्ये माझ्या जीवाला धोका असल्याचे माहिती झाल्यास वडील मला बाहेरगावी शिकण्यासाठी पाठवून देतील. शिवाय खंडणीच्या माध्यमातुन काही पैसे मिळाल्यास मला त्यातुन मोबाइल गेम खेळता येइल असा विचार करुन त्याने हे सर्व प्लानींग केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. स्वत:च्या अल्पवयीन मुलानेच हा सारा डाव रचल्याचे माहिती होताच तक्रारदार आणि त्यांचे नातेवाईक हादरून गेले आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आर्णी ठाणेदार पीतांबर जाधव, सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, कर्मचारी गजानन डोंगरे, विशाल भगत, कवीश पाळेकर, पंकज गिरी, अजय निंबोळकर, सतीष सोनोने, रोशनी जोगळेकर, प्रवीण कुथे यांच्या पथकाने पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...