आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्षुल्लक कारणावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. ही घटना शहरातील वाशीम मार्गावर इरिगेशन कॉलनीच्या गेट समोर गुरूवार, दि. ४ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मारहाणीत सुशील कांबळे वय ३२ वर्ष रा. शांतीनगर हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी विवेक अंभोरे वय ३१ वर्ष रा. शांतीनगर या युवकाने वसंतनगर पोलिसांत तक्रार दिली.मुलतानवाडी तांडा येथे राहणारे शेख सलीम शेख समशेर उर्फ सल्ल्या वय २० वर्ष, तसलीम शेख जाफर शेख वय २० वर्ष, शेख साहिल शेख नजीर वय २१ वर्ष, सय्यद आयान सय्यद रहमान वय २० वर्ष याच्यासह शेख इमरान शेख सुलतान वय २४ वर्ष रा.मोमीनपुरा, शेख नुमान शेख रहमान १९ वर्ष रा. अक्सा चौक वसंत नगर आणि शेख बादल शेख शम्मी वय १९ वर्षे रा. मोमीनपुरा अशी त्या सात जणांची नावे आहे.शांती नगर येथील विवेक अंभोरे हा जेवण केल्यानंतर घराबाहेर फेरफटका मारत होता. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने विवेक याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विवेक याला शेख सलीम शेख समशेर याने जाती वाचक शिवीगाळ केली. यावेळी सुशील कांबळे हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता, त्याला दगडाने मारहाण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.