आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:वारंवार फोन कराल तर काम सोडून देण्याची धमकी; ठेकेदाराचा मुजोरपणा, सोईट ढाणकी रस्त्याचे काम

ढाणकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सुरू असलेल्या ढाणकी सोईट रस्त्याची मजबुतीकरण व पुनर्बांधणीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून त्यामध्ये खदानींचा दगड न वापरता हलक्या दर्जाचा मांजरा दगड वापरल्या जात आहे. तसेच हे काम अतिशय संथ गतीने होत असल्याने शेतकरी तसेच नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यांची गुणवत्ता व दर्जा बाबत अनेक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तोंडी व लेखी तक्रारी सुद्धा केल्या होत्या. तशाही परिस्थितीत संबंधित ठेकेदारांनी कोणालाही न जुमानता मनमानीचा कळस गाठत रस्त्याचे काम पूर्ण करत ढाणकी शहराच्या एक किमी अंतरावर आणून अर्धवट अवस्थेत ठेवल्यामुळे प्रवाशांसह शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून ये-जा करणे मोठे जिकरीचे बनले आहे. नागरिकांची वाढती ओरड बघून बांधकाम विभागाने काही दिवसापूर्वी त्या रस्त्याचे रुंदीकरण च्या कामाला सुरुवात केली. मात्र संबंधित ठेकेदार या कामात कुचराई करत असून अतिशय निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवत असल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये हा रस्ता पाण्यासोबत वाहून जाईल, असे सुद्धा नागरिकात बोलले जात आहे.

ठेकेदारावर कारवाई करा, गावकऱ्यांची मागणी
या रस्त्याच्या चौकशी संदर्भात ठेकेदार संतोष चव्हाण यांना फोन केला असता, मला वारंवार फोन करू नका, आणि कोणत्याही प्रकारची माहिती विचारायची असल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारा. यानंतर जर फोन कराल तर मी काम बंद करून टाकेल, अशा स्वरूपात धमकी दिल्याची सुद्धा नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा मुजोर ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

खते नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण
या रस्त्यावरून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते. आता पेरणीचे दिवस सुद्धा जवळ आले असल्याने या खराब रस्त्यामुळे बी-बियाणे तसेच खते नेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण होणार आहे. तरी संबंधित ठेकेदाराने काम नियमानुसार व मजबूत करणे गरजेचे असून भविष्यात हा रस्ता तग धरू शकेल.
गजानन मिटकरे, सा. कार्यकर्ता.

बातम्या आणखी आहेत...