आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डाक बँकिंग सेवेचे साडेतीन लाख ग्राहक, एटीएम कार्ड, नेट बँकिंग; कुठुनही पैसे भरणे, पाठवण्याची सुविधा

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ व्या शतकात जसे तंत्रज्ञान वाढू लागले तशी डाक सेवा बंद कालबाह्य होऊ लागली होती. मात्र, यात बँकेप्रमाणे सेवा सुरु करण्यात आल्याने तसेच पोस्ट कार्यालयातही आधुनिक तंत्रज्ञान वापरून व्यवहार सुरू केले. त्यामुळे पारंपरिक डाक पाठवण्यासह नवीन सेवांचाही लाभ लोकांना मिळू लागला. त्यामुळे बँकेच्या योजना डाक कार्यालयात सुरु आहेत. याचे जिल्ह्यात तीन लाख ६३ हजार ३९३ ग्राहक लाभ घेत आहेत.

पैशांचे व्यवहार करण्यासाठी तसेच एटीएम कार्ड, चेकबुक, पासबुक, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग आदी सेवा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेचा आधार घेण्यात येत होता. अद्यापही नागरिक बँकांच्या बाहेर उभे राहून नंबर लागण्याची प्रतीक्षा करत असतात. दुसरीकडे पोस्ट खात्यात बँक प्रमाणेच या सर्व सुविधा मिळत असल्याने दिवसेंदिवस याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

विशेष म्हणजे केवळ बचत खातेच नसून त्यासह विविध प्रकारच्या बँकिंगच्या योजना सुरु आहेत. २०१७ या वर्षांपासून योजनांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. मात्र, बँकांच्या तुलनेत नागरिकांना पोस्टाची फारशी माहिती नसते. त्याच बरोबर काही बँकेत खाते उघडण्यासाठी ३ ते ५ हजार रुपये तर दुसरीकडे पोस्टात मात्र कमीत कमी केवळ १०० रुपये ते ५०० रुपये खात्यावर ठेवण्याची अट आहे.

बातम्या आणखी आहेत...