आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाव तालुक्यातील माळवागद येथे राहणारा व्यक्ती आईच्या उपचारांकरिता पुसदला आला होता. यावेळी बरखा टाकीच्या मागे तिघांनी त्याला अडवून लुटले होते. त्या घटनेतील तिघांना पकडण्यात शहर पोलिसांना यश मिळविले आहे. ओम राजू भालेराव रा. तुकाराम बापू वार्ड, जितेंद्र उर्फ रोहित मनवर रा. शिवाजी वार्ड आणि विनोद बाबुराव गोदमले रा.तुकाराम बापू वार्ड असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महागाव तालुक्यातील माळवागद येथे राहणारे अनिल राठोड यांनी दि. ९ एप्रिलला त्याच्या आईला उपचारांकरिता पुसद येथे घेऊन आले होते. त्यानंतर त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करिता बरखा टाकीच्या मागून जात होते.
यावेळी अनोळखी तिघांनी त्यांच्याजवळील दोन हजार रुपये नगदी व तेरा हजार रुपयाचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-२९-बीडब्ल्यू-२२ ४२ दुचाकी आणि इतर मुद्देमाल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज अतुलकर, पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख अनिल सावळे यांच्यासह प्रफुल्ल इंगोले, शुध्दोधन भगत,आकाश बाभुळकर व वैजनाथ पवार यांनी पार पाडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.